श्रेयस अय्यर बनू शकतो मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू   

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमल कामगिरी करणारा भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरची न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि जेकब डफीसह मार्च महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजेतेपदाच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या अय्यरने पाच सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह २४३ धावा केल्या.
 
"उजव्या हाताच्या फलंदाजाने मार्चमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ५७.३३ च्या सरासरीने १७२ धावा केल्या आणि तो या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता," असे आयसीसीने एका प्रकाशनात म्हटले आहे. "भारताच्या नाबाद मोहिमेत अय्यरचे योगदान महत्त्वपूर्ण होते," असेही त्यात म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्ध अ गटातील सामन्यात त्याने ७९ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत ४५ धावा केल्या. याशिवाय न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यातही त्याने ४८ धावा केल्या होत्या.
 
"डावाला अँकर करण्याची आणि भागीदारी निर्माण करण्याची त्याची क्षमता भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली," असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. रवींद्रने चार सामन्यांत दोन शतकांसह २६३ धावा केल्या आणि तीन बळीही घेतले. तर जगातील नंबर वन टी-२० गोलंदाज डफीने मार्चमध्ये ६ विकेट घेतल्या होत्या. १७ च्या इकॉनॉमी रेटने १३ विकेट घेतल्या.यूएसएच्या चेतना प्रसाद, ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वॉल मार्च महिन्याच्या आयसीसी च्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूच्या शर्यतीत आहेत.

Related Articles